BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी! 232 पदांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज

BEL Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 232 जागांसाठी नवीन भरती करण्यात येणार आहे यामध्ये प्रोबेशनरी इंजिनिअर व प्रोबेशनरी ऑफिसर तसेच प्रोबेशनरी अकाउंट ऑफिसर या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत या भरतीसाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत या पोस्टद्वारे आपण या पदासाठी अर्ज कसा करू शकाल, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल, याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा काय असेल, याबद्दल माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत

BEL Recruitment 2023 तपशील?

पद प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी अकाउंट ऑफिसर
पदसंख्या 232
वयोमर्यादा 25-30
अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2023
वेतन CTC 12 Lacs
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
वेबसाईट www.bel-india.in

 

BEL Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता?

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी दिली गेली आहे त्याबद्दलची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

प्रोबेशनरी इंजिनिअर:

प्रोबेशनरी इंजिनिअर पदासाठी उमेदवाराला संबंधित शाखेची इंजीनियरिंग पदवी असणे आवश्यक आहे.

प्रोबेशनरी ऑफिसर:

प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी उमेदवाराकडे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन, पर्सनल मॅनेजमेंट या विषया अंतर्गत येणाऱ्या एमबीए, एमएसडब्ल्यू ,पीजी किंवा पीजी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

प्रोबेशनरी अकाउंट ऑफिसर:

प्रोबेशनरी अकाउंट ऑफिसर या पदासाठी उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रता ही CA किंवा CMA झालेले असावे.

BEL Recruitment 2023 वयाची अट काय आहे?

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2023 यासाठी पात्र उमेदवारचे वय जर उमेदवार जनरल प्रवर्गातून मधून येत असेल तर त्याचे वय 25 वर्षे ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे परंतु उमेदवार हा ओबीसी प्रवर्गातून मधून असेल तर त्याला 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे तसेच जर उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गातून मधून येत असेल तर त्याला 05 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

BEL Recruitment 2023 अर्जासाठी शुल्क किती लागेल?

भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करणारा उमेदवार जर खुल्या प्रवर्गांमधून येत असेल किंवा ओबीसी पीडब्ल्यूडी प्रवर्गांमधून असेल तर त्याला 1180 रुपये फीस अर्ज करताना लागेल व जर उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गांमधून असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची फीस भरावी लागणार नाही.

BEL Recruitment 2023 अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड च्या या लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/84142/Index.html वरती क्लिक करावे लागेल.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ची ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर दिसेल त्याच्या उजव्या कॉर्नरला तुम्हाला रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अर्ज करणार आहात ती पोस्ट सिलेक्ट करा व तुमचा पोस्ट कोड आणि तुमची वैयक्तिक माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्या.
  • माहिती भरून घेतल्यानंतर जनरेट ओटीपी वरती क्लिक करा तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वरती किंवा ईमेल आयडीवरती तुम्हाला ओटीपी येईल तो व्हेरिफाय करून व्रि व्हेरिफाय करून घ्या.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती युजर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल तो टाकून लॉगिन करू शकता.

BEL Recruitment 2023 निवड प्रक्रिया?

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) भरती 2023 साठी निवड करताना उमेदवाराला सर्वप्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल लेखी परीक्षेमध्ये पात्र झालेला उमेदवाराला मुलाखत घेण्यासाठी बोलावले जाईल व मुलाखतीमध्ये पास झाल्यानंतर उमेदवाराची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल व त्याला नोकरी वरती रुजू करण्यात येईल.

BEL Recruitment 2023 जाहिरात?

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2023 बद्दलची जाहिरात पाहण्यासाठी दिलेल्या या https://drive.google.com/file/d/1lpkt8ytLgBie-OTU0JxjJrrwJc8h2gAp/view?pli=1 लिंक वरती क्लिक करा व याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही या जाहिराती अंतर्गत पाहू शकाल.

BEL Recruitment 2023 भरतीसाठी महत्वाच्या टिप्स?

  • तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदासाठी सर्व पात्रता निकष पूर्ण करत आहात याची खात्री करा.
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक आणि अचूक भरून घ्या.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडा.
  • लेखी परीक्षा व मुलाखतीची चांगल्या प्रकारे तयारी करा.
  • मुलाखतीला जाताना पूर्ण आत्मविश्वासाने आणि सकारात्मक विचार घेऊ मुलाखतीला जा.

Read More: RBI Recruitment 2023

निष्कर्ष:

मित्रांना ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला BEL Recruitment 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर यामध्ये कुठलीही माहिती आमच्याकडून विसरली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवू शकता जेणेकरून आम्ही ती माहिती तात्काळ या पोस्टमध्ये ऍड करू शकाल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना पण नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या भरतीबद्दल माहिती होईल

 

 

Leave a Comment