Bank of Maharashtra Personal Loan | महाराष्ट्र बँक वैयक्तिक कर्ज योजना

Table of Contents

Bank of Maharashtra Personal Loan In Marathi

मित्रांनो या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्तीला पैशांची गरज भासते कारण कोरोना काळानंतर बेरोजगारी एवढी वाढली आहे की लोकांकडे उदरनिर्वाह करण्यासाठीसुद्धा पुरेसे पैसे नाहीत अशात आपली व आपल्या फॅमिली मेंबर ची स्वप्न पूर्ण करायची असल्यास आपल्याला पुरेसा पैसा मिळत नाही मित्रांनो पैशाला किती किंमत आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे .

bank of maharashtra personal loan

पैसा असेल तर सगळ्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो पण त्या व्यतिरिक्त पैसा हा मुलांच्या शिक्षणासाठी लागतो किंवा आपल्याला एखादा व्यवसाय उभा करायचा असल्यास आपल्या गरजा भागवण्या साठी आपल्याला पैसा लागतो पैसे आणायचे तरी कुठून हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते तर मित्रांनो आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण बँकेकडून वैयक्तिक कर्जाची सुविधा आपल्याला मिळते ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टमध्ये आपण Bank of Maharashtra Personal Loan कसे घ्यावे याबद्दल माहिती घेणार आहोत.

Maharashtra बँकेकडून किती कर्ज मिळू शकते? How Much Loan Can I Get From Bank of Maharashtra?

मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेत असाल तर तुम्हाला कमीत कमी 25 हजार आणि जास्तीत जास्त 20 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज महाराष्ट्र बँकेकडून दिले जाते तुम्हाला किती कर्ज हवे आहे ते पूर्णपणे तुमच्या वरती अवलंबून आहे.

Maharashtra बँकेकडून किती कालावधीसाठी कर्ज मिळू शकते? How Long Can I Get a Loan From Bank of Maharashtra?

महाराष्ट्र बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पगार असलेल्या व्यक्तीला 7 वर्षांचा कालावधी मिळतो आणि इतर व्यक्तींना 5 वर्षांचा कालावधी महाराष्ट्र बँकेकडून मिळतो.

Maharashtra बँक वैयक्तिक कर्ज व्याजदर 2023? Bank of Maharashtra Personal Loan Interest Rate 2023

महाराष्ट्र बँकेकडून तुम्ही वैयक्तिक कर्ज घेत असाल तर बँकेकडून तुमचा सिबिल स्कोर पहिला जातो ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोअर 600 ते 649 पर्यंत असेल अशा व्यक्तींना १२.८०% व्याजदर आणि ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोअर 650 ते 699 असेल अशा व्यक्तींना वार्षिक व्याजदर 11.30 टक्के लागेल व ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर 700 किंवा 750 पेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींना वार्षिक व्याजदर 9.45% व्याजदर वरती महाराष्ट्र बँकेकडून कर्ज दिले जाते

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जाची कागदपत्रे? Bank of Maharashtra Personal Loan Documents

मित्रांनो प्रत्येक बँकेकडून कर्ज घेताना आपल्याला कागदपत्रांची आवश्यकता लागते तसेच बँक ऑफ महाराष्ट्रकडून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रे द्यावी लागतील: यादी खालीलप्रमाणे दिली आहे.
ओळखीचा पुरावा? Proof of Identification
 • मतदार ओळखपत्र
 • पॅन कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • पासपोर्ट
 • (यापैकी एक असू शकतो)
राहण्याचा पुरावा? Proof of Residence
 • लाईट बिल
 • रेशन कार्ड
 • बँक स्टेटमेंट
 • रेंट एग्रीमेंट
 • (यापैकी एक)
उत्पन्नाचा पुरावा: Proof of income
 •  वेतन स्लिप
 • बँक स्टेटमेंट
 • आयटी रिटर्न
 • (यापैकी एकअसू शकते )

बँक स्टेटमेंट: तुम्हाला तुमचे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट देणे आवश्यक आहे.

वयाचा पुरावा: जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला देणे आवश्यक आहे.
पासपोर्ट फोटो: तुम्हाला पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावे लागेल.
पगार असणाऱ्या व्यक्तींना पाठीमागील पाठीमागील 3 महिन्याची सॅलरी स्लिप आणि सॅलरी अकाऊंट चे पाठीमागील 6 महिन्यांची बँक स्टेटमेंट देणे अनिवार्य आहे.
व्यवसायिक किंवा पगार नसलेल्या व्यक्तीला टॅक्स रजिस्त्रेशन कॉपी, कंपनी रजिस्ट्रेशन लायसन, पाठीमागील एक वर्षाचा बँक स्टेटमेंट देणे अनिवार्य आहे

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज पात्रता? Bank of Maharashtra Personal Loan Eligibility

 • सिबिल स्कोर 700 पेक्षा जास्त असला पाहिजे
 • भारताचा नागरिक असला पाहिजे
 • कमीत कमी वीस हजाराच्या पुढे पगार असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र बँक वैयक्तिक कर्जासाठी तुमचे वय कमीतकमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 60 वर्षांपर्यंत असायला पाहिजे
 • तुमचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी 3 लाखांपर्यंत असायला पाहिजे

बँक ऑफ महाराष्ट्रकडून वैयक्तिक कर्जाचे फायदे? Benefits of Personal Loan from Bank of Maharashtra?

 • जास्त कर्जाची रक्कम मिळते
 • कोणताही दंड आकारला जात नाही
 • कमीत कमी कागदपत्रे लागतात
 • छुपे शुल्क घेतले जात नाही
 • कमीत कमी प्रोसेसिंग फीस लागते
 • कर्जाची स्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे
 • महाराष्ट्र बँकेच्या वैयक्तिक कर्ज वरती तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतात

बँक ऑफ महाराष्ट्रकडून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा? How To Apply For a Personal Loan From Bank of Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्यासाठी तुम्हाला दोन पर्याय मिळतात ज्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज
 • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट  www.bankofmaharashtra.in भेट द्यावी लागेल.
 • वेबसाईट उघडल्यानंतर डाव्या बाजूस ऑनलाइन कर्ज हा पर्याय निवडावा लागेल.
 • त्यानंतर वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडावा लागेल
 • तुमचे खाते महाराष्ट्र बँकेत असेल तर होय आणि जर नसेल तर नाही हा पर्याय निवडा
 • त्यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि वन टाइम पासवर्ड टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागेल
 • त्यानंतर वैयक्तिक कर्जासाठी विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरून घ्यावी
 • ही माहिती भरल्यानंतर जर तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर बँकेकडून तुम्हाला फोन येईल किंवा कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल
ऑफलाईन अर्ज
मित्रांनो जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असाल तर तुम्हाला जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्रा च्या शाखेमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल बँकेचे कर्मचारी तुम्हाला याबद्दल मदत करतील.

महाराष्ट्र बँकेचा टोल फ्री नंबर काय आहे?What is the toll free number of Maharashtra Bank?

मित्रांनो महाराष्ट्र बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर यापूर्वी तुम्ही बँकेच्या टोल फ्री नंबर वरती संपर्क करून माहिती घेऊ शकता टोल फ्री नंबर खालील प्रमाणे दिले आहेत
टोल फ्री नंबर: १८०० २३३ ४५ २६,  १८०० १०२ २६ ३६
मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्ट द्वारे महाराष्ट्र बँकेकडून वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा आणि ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेर करा जेणेकरून त्यांना पण या माहितीचा फायदा नक्कीच होईल.

Leave a Comment