Badminton Information In Marathi | बॅडमिंटन खेळाविषयी मजेदार माहिती

नमस्कार मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टद्वारे आपण Badminton information in Marathi मध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बॅडमिंटन हा खेळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर ती खूप प्रसिद्ध खेळ आहे या खेळाला सध्याच्या काळात खूप लोकप्रियता वाढली आहे आणि हा खेळ ऑलिंपिक मध्ये पण खेळला जातो.

Badminton information in Marathi

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेलच भारतामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात त्यापैकी एक खेळ म्हणजे बॅडमिंटन हा खेळ रॅकेट आणि फुल म्हणजेच (शटल कॉक) या दोन साहित्याच्या मदतीने खेळला जातो भारताबरोबरच अनेक देशांमध्ये हा खेळ खेळला जातो त्यामुळे सध्याच्या काळात बॅडमिंटन या खेळाची लोकप्रियता अधिक पटीने वाढली आहे बॅडमिंटन हा खेळ अतिशय वेगवान पद्धतीने खेळला जातो त्यामुळे हा खेळ खेळण्यासाठी उत्तम शैलीची गरज असणे आवश्यक आहे आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नसेल बॅडमिंटन हा खेळ बंदिस्त मैदानामध्ये खेळला जातो व त्या मैदानाला कोर्ट असे म्हणतात हा खेळ पुरुषवर्ग तसेच महिलावर्ग दोन्हीही हा खेळ खेळू शकतात सध्या लहान मुले पण हा खेळ खूप आवडीने खेळत आहेत.

badminton information in marathi

हा खेळ दोन पद्धतीने खेळला जातो ज्यामध्ये पहिली पद्धत म्हणजे एकेरी खेळ एकेरी खेळामध्ये दोन खेळाडू खेळू शकतात व दुसरी पद्धत म्हणजे दुहेरी खेळ या खेळामध्ये चार व्यक्ती खेळू शकतात बॅडमिंटन हा खेळ राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ती खूप उत्साहाने खेळला जातो आपल्या भारत देशाला बॅडमिंटन खेळाच्या माध्यमातून पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल या दोन महिला खेळाडूंनी आपले नाव बनवले आहे.

बॅडमिंटन खेळाविषयी माहिती?

खेळाचे नाव बॅडमिंटन
खेळाचे मैदान कोर्ट
साहित्य रॅकेट व फुल (शटलकॉक)
मैदाना विषयी माहिती 13.4 मीटर बाय 5.18 मीटर
खेळाडूंची एकूण संख्या एकेरी दोन खेळाडू दुहेरी चार खेळाडू
खेळाचे प्रकार एकेरी व दुहेरी

 

बॅडमिंटन खेळाचा इतिहास?

सर्वप्रथम आपण बॅडमिंटन खेळाच्या इतिहासाबद्दल सविस्तर रित्या माहिती घेऊ बॅडमिंटन खेळाची सुरुवात कधी व कशी झाली याबद्दल अनेक लोकांची अनेक मते आहेत असे म्हटले जाते की बॅडमिंटन हा खेळ सर्वप्रथम ग्रीस आणि इजिप्त या देशांमध्ये खेळला जायचा या खेळाला तिथे बॅटल डोर असे म्हटले जायचे पण काही लोकांची अशी मते आहेत की हा खेळ सर्वप्रथम भारतामध्ये सुरू झाला कारण अठराव्या शतकामध्ये ब्रिटिश लोक हे भारतामध्ये आले होते व ब्रिटिश लोक 1850 मध्ये हा खेळ खेळायचे त्यामध्ये ब्रिटिश कर्मचारी हा खेळ खेळत होते बॅडमिंटन या खेळाला प्रथम सुरुवात ही पुणे शहरांमध्ये केली गेली होती म्हणून या खेळाला पुना किंवा पुनाईअसे नाव दिले गेले होते.

पण सध्याच्या बॅडमिंटन खेळायला पाहून या खेळाची सुरुवात ही इंग्लंडमध्ये सर्वप्रथम झाली असे म्हटले जाते हे जे अधिकारी भारतामधून रिटायर होऊन परत इंग्लंडला गेले त्यांनी हा खेळ इंग्लंडमध्ये खेळण्यास सुरुवात केली व या खेळामध्ये नियम व अटी लागू केल्या गेल्या व सन 1873 मध्ये खऱ्या अर्थाने या खेळाला बॅडमिंटन खेळ असे म्हटले गेले व त्यानंतर 1883 मध्ये बॅडमिंटन इंग्लंड असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली व 1899 मध्ये जगातील पहिली बॅडमिंटन प्रतियोगिता सुरू करण्यात आली.

बॅडमिंटन खेळाच्या मैदाना विषयी माहिती?

बॅडमिंटन या खेळाला इंडोर गेम म्हणजेच बंदिस्त खेळ असे म्हटले जाते हा खेळ जागतिक स्तरावरती खेळला जाणारा खेळ आहे बॅडमिंटन खेळाच्या मैदानाविषयी सांगायचे झाले तर बॅडमिंटन खेळाच्या मैदानाला कोर्ट असे म्हटले जातात या कोडचा आकार आयताकृती असतो कोर्ट म्हणजेच मैदानाची साईज ही 13.4 मीटर बाय 5.18 मीटर इतकी असते म्हणजेच (14 फूट बाय 17 फूट) व कोर्टच्या मध्यभागी 1.5 मीटरचे जाळे लावलेले असते.

Badminton Court

बॅडमिंटन खेळाचे नियम?

मित्रांनो बॅडमिंटन हा खेळ सर्वत्र खेळला जातो पण हा खेळ जर तुम्ही घरी खेळत असाल तर त्यासाठी कुठलेही नियम नाहीत आपण तो कशाही पद्धतीने खेळू शकतो पण जर तुम्ही एखाद्या बॅडमिंटन प्रतियोगिता मध्ये भाग घेत असाल किंवा तुमच्या कॉलेजमध्ये बॅडमिंटनची स्पर्धा ठेवली असेल तर त्यासाठी कोणकोणते नियम लागतात याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ.

एकेरी बॅडमिंटन नियम 

  • या खेळामध्ये दोन खेळाडू खेळतात एक नेटच्या पलीकडून आणि एक नेटच्या अलीकडून.
  • सर्वप्रथम टॉस जिंकणारा खेळाडू ठरवू शकतो की तो सर्व्ह करणार आहे की साईट घेणार आहे.
  • प्रत्येक डावातील पहिला सर्व हा उजव्या बाजूने केला जातो.
  • हा खेळ तीन सेटमध्ये खेळला जातो.
  • हे तिन्ही सेट 21 गुणांचे असतात.
  • जो खेळाडू दोन सेट जिंकेल तो विजेता ठरवला जातो.
  • तिसऱ्या सेट पर्यंत खेळ पोचल्यानंतर खेळाडू आपली साईड बदलू शकतात.
  • कॉक जर शरीराला स्पर्श झाला असेल तर अपोजिट खेळाडूला पॉईंट दिले जातात.
  • जर खेळाडूचे रॅकेट नेट ला स्पर्श केले असेल तर अपोजिट खेळाडूला त्याचे पॉईंट दिले जातात.
  • नेटच्या खालून कॉक ला मारू शकत नाहीत.
  • जोपर्यंत समोरच्या बाजूचा खेळाडू खेळण्यासाठी तयार नसतो तोपर्यंत दुसरा खेळाडू सर्विस करू शकत नाही.
  • या खेळात पाच मिनिटांचा मध्यांतर असतो.

बॅडमिंटन खेळण्यासाठी लागणारे साहित्य?

मित्रांनो आपण जर नवीन असाल आणि आपल्याला माहीत नसेल की बॅडमिंटन खेळण्यासाठी कोण कोणते साहित्य लागते तर आपण बॅडमिंटन खेळण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी खाली दिली आहे ती घेऊन तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता.

badminton information in marathi

  • रॅकेट
  • बॅडमिंटन शूज
  • बॅडमिंटन ग्रीप
  • बॅडमिंटन स्ट्रिंग्स
  • बॅडमिंटन शटल
  • स्किपिंग रोप
  • किट बॅग

बॅडमिंटन खेळण्याचे फायदे?

स्नायूंची ताकद वाढवणे?

बॅडमिंटन खेळण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तो स्नायूंची ताकद वाढवतो आणि तुम्हाला मजबूत बनवतो आणि इथून ते तिथपर्यंतच्या सतत हालचालींमुळे तुमचे स्नायू तयार होतात तसेच त्यांना परिपूर्ण संरचनेत टोन केले जाते.

हृदयाची कार्यक्षमता वाढवणे?

बॅडमिंटन खेळते वेळेस आपल्या शरीराची सतत हालचाल होते सतत होणाऱ्या हालचालीमुळे आपल्या शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते या व्यतिरिक्त सतत हालचालीमुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या मधील रक्त प्रवाह सुरळीत चालतो यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो आणि ज्या लोकांच्या हृदयामध्ये ब्लॉकेज तयार होत असतील ते नाहीसे होऊन रक्त प्रवाह सुरळीत चालण्यास मदत होते.

तणाव कमी करण्यास मदत होते? 

मित्रांनो बॅडमिंटन खेळणे हे एक चांगली सवय आहे आणि ती आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी ठरते आपल्या सर्वांना माहीत असेलच आपल्याला ताण तणाव असेल तर तो आपल्याला दिवसेंदिवस आतून कमकुवत बनवत जातो त्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता दोन्ही कमी होत जातात आणि आपण एक जिवंत झोंबी सारखे बनतो पण जर आपण बॅडमिंटन खेळ हा रोज एक तास जरी खेळलात तर आपल्या शरीरातील ताण आणि तणाव कमी होण्यास मदत होते आणि आपल्या जीवनाला एक चालना मिळते आणि आपण आनंदी आणि सुखी जीवन जगू शकता.

पचनक्रियेची क्षमता वाढवते?

निरोगी जीवन जगण्यासाठी आपली पचनक्रिया चांगली असणे आवश्यक असते त्यामुळे बॅडमिंटन हा खेळ आपल्यासाठी खूप चांगला आहे कारण बॅडमिंटन खेळताना आपल्या शरीराची हालचाल होते त्यामुळे आपल्याला डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्याला घाम येतो आणि आपल्याला नैसर्गिकरीत्या आलेला घाम आपल्या शरीरातील कॅलरीज जाळून टाकतो त्यासोबतच घामामार्फत आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते त्यासोबतच आपली पचनक्रिया वाढण्यास सुद्धा मदत होते व आपण तंदुरुस्त आणि शारीरिकरित्या सुदृढ बनण्यास मदत होते.

आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते?

आपल्या दैनंदिन जीवनात दररोज बॅडमिंटन खेळल्याने आपल्या हाताची आणि पायांची हालचाल होते त्यामुळे आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम मॅट्रिक्स विकसित होतात त्यामुळे हाडांचा फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो व हाडे मजबूत होण्यास मदत होते.

भारतातील सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडू?

मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांना माहिती नसेल की भारतातील सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडू कोणते आहेत त्याबद्दलची यादी खालील प्रमाणे दिली आहे ती आपण पाहू शकता.

  • पी व्ही सिंधू
  • सानिया नेहवाल
  • श्रीकांत किडांबी
  • पुल्लेला गोपीचंद
  • प्रकाश पादुकोण
  • पारुपल्ली कश्यप
  • ज्वाला गुट्टा
  • लक्ष्य सेन
  • अश्विनी पोनप्पा
  • अपर्णा पोपट
  • प्रणॉय एच. एस.
  • B. साई प्रणीत
  • प्रियांशू राजावत
  • आकर्षी कश्यप
  • मिथुन मंजुनाथ

निष्कर्ष

मित्रांनो आशा करतो की बॅडमिंटन इन मराठी मध्ये वरील दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल आपण या पोस्टच्या माध्यमातून बॅडमिंटन खेळाविषयी आणि त्याबद्दल लागणाऱ्या साहित्याबद्दल बॅडमिंटनच्या इतिहासाबद्दल आणि बॅडमिंटन पासून होणारे फायदे व भारतातील सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू बद्दल आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या माहितीचा फायदा होईल धन्यवाद.

FAQ.

Q1. बॅडमिंटन या खेळाचे पहिले नाव काय?

असे म्हटले जाते की इंग्रजांनी भारतामध्ये या खेळाची सुरुवात केली त्यावेळी या खेळाचे नाव (पुनाई) असे होते सध्या त्याला शटल कॉक किंवा बॅडमिंटन असे म्हणतात.

Q2. बॅडमिंटन खेळाचे प्रकार किती आहेत?

बॅडमिंटन या खेळाचे दोन प्रकार आहेत पहिला एकेरी आणि दुसरा दुहेरी.

Q3. भारतात बॅडमिंटनची सुरुवात कधीपासून झाली?

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया च्या स्थापनेनंतर 1899 मध्ये भारतात बॅडमिंटन या खेळात सुरुवात झाली.

Q4. भारतातील पहिला बॅडमिंटन खेळाडू कोण होता?

ज्वाला गुट्टा ही भारतातील पहिली बॅडमिंटन खेळाडू आहे?

Leave a Comment