AIIMS Nagpur Recruitment 2023 : मित्रांनो अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर म्हणजेच ए आय आय एम एस यांच्यातर्फे विविध पदासाठी भरती करण्यात येणार असून याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील विविध पदे भरती केली जातील ही संस्था सेंट्रल गव्हर्मेंट च्या अंडर येत असल्यामुळे तुम्हाला गव्हर्मेंट महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळू शकेल यामध्ये परिचर पदासह, विविध पदांची भरती करण्यात येणार आहे या जाहिरातीनुसार जवळपास 54 जागांची भरती ए आय आय एम एस तर्फे करण्यात येणार आहे याबद्दलचा ऑनलाईन अर्ज कसा करता येईल यासाठी पात्रता काय असेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.
मित्रांनो अखिल भारतीय आयुर्वेद ज्ञान संस्थान नागपूर ते सेंट्रल गव्हर्मेंट च्या अंडर मध्ये काम करते त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र मध्ये गव्हर्मेंट जॉब करण्याची संधी या संस्थेमार्फत आपल्याला दिले जात आहे याबद्दलची ऑनलाईन परीक्षा ही आपण मुंबईमध्ये किंवा नागपूर मध्ये देऊ शकाल.
अर्ज भरण्याची तारीख
दिनांक 4 जुलै 2023 पासून यासाठी अर्ज सुरू करण्यात येणार आहेत व अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै 2023 ही आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/post-details या संकेत स्थळावर जाऊन लवकरात लवकर भरून घ्यावे
पदाचे नाव व जागा
- हॉस्पिटल अटेंडेंट ग्रेड 3- 40
- लॅब टेक्निशियन – 5
- असोसिएट प्रोफेसर/रीडर – 2
- लैब अटेंडेंट ग्रेड 2-2
- टेक्निकल असिस्टेंट/टेक्निशियन -1
- रोखपाल -1
- कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (LDC) -1
- वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते -1
- स्टेनोग्राफर – 1
लागणारी कागदपत्रे
मित्रांनो या पदासाठी अर्ज करताना तुम्हाला तुमचा बायोडाटा, त्यासोबतच दहावी बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे, त्यासोबतच तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला व जातीचा दाखला जर मागासवर्गीय उमेदवार असाल तर त्यासोबतच तुमचं ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड किंवा लायसन्स, आणि पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता लागेल.