Ai Free Training: नमस्कार मित्रांनो ए आय (Artificial Intelligence) विषयी आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी व नवीन गोष्टींविषयी माहिती जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांसाठी केंद्र सरकारकडून एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी 14 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे घेणार आहोत.
भारत सरकारद्वारे मोफत AI प्रशिक्षण कार्यशाळा?
मित्रांनो देशातील पहिले ए आय फ्री ट्रेनिंग विद्यापीठ लवकरच महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे हे विद्यापीठ मुंबई जिल्ह्याजवळ कर्जत येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाविषयी माहितीचा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने नवीन क्रांती घडवून आणली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक मोठा बदल आहे यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठा बदल होण्यास सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस या तंत्रज्ञानाची आवड लोकांना त्याकडे आकर्षित करीत आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा फायदा अनेक क्षेत्रांमध्ये होत आहे याला मानवी भाषा म्हणजेच तोंडी दिलेले आदेश समजतात तसेच आयटी सेक्टर मधील कोडींग, सॉफ्टवेअर कोडींग, एडिटिंग अशा अनेक गोष्टी ए आय मार्फत केल्या जात आहेत या तंत्रज्ञानाची मागणी मार्केटमध्ये वाढत चालली आहे.हे पाहता केंद्र सरकारने या तंत्रज्ञानाची फ्री ट्रेनिंग देशातील विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी फ्री ए आय ट्रेनिंग विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
एआय फॉर इंडिया 2.0 काय आहे?
एआय फॉर इंडिया 2.0 ही भारताच्या भविष्यासाठी केंद्र सरकारकडून राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे भारताला एआय क्षेत्रात एक प्रमुख शक्ती बनण्यास मदत होईल आणि भारताला एक सुरक्षित, समृद्ध आणि सुंदर देश बनण्यास मदत होईल. या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक राज्यात आणि राज्यातील प्रत्येक शहरात व गावात हे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. व हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे त्यासाठी आपण रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
जागतिक युवा दिन म्हणजेच 15 जुलै रोजी या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे ए आय मोफत ट्रेनिंग प्रोग्राम स्किल इंडिया व आयआयटी मद्रास, आय आय एम व जी यु व्ही यांनी मिळून बनवला गेलेला उपक्रम आहे. हे मोफत प्रशिक्षण आपल्याला मराठी हिंदी इंग्रजी गुजराती तेलगू कन्नड मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये आपल्याला दिले जाणार आहे.
एआय मोफत प्रशिक्षण रजिस्ट्रेशन कसे करावे?
- एआय मोफत ट्रेनिंग घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला www.guvi.in या ऑफिशियल संकेतस्थळावर जावे लागेल
- तिथे गेल्यावर आपल्याला GUVI’s Ai For India 2.0 त्याच्याखाली रजिस्ट्रेशन नावाचा पर्याय दिसेल.
- या पर्यायावर क्लिक केल्यास आपल्याला एक फॉर्म ओपन होईल जिथे आपली सर्व माहिती भरून घ्यावी लागेल जसे की आपले पूर्ण नाव ईमेल आयडी, मोबाईल नंबर आपले काय शिक्षण झाले आहे सध्या तुम्ही काय करता आणि कोणत्या भाषेमध्ये आपल्याला शिकायचे हे सर्व माहिती भरून घ्यावी लागेल.