Aadhar Card Update 2023 : निशुल्क अपडेट करा आपले आधार कार्ड

Aadhar Card Updae 2023: मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहेच सध्याच्या काळात आधार कार्ड चे महत्व आपल्या जीवनात किती आहे कारण प्रत्येक कामामध्ये आपल्याला आपला ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड द्यावे लागते प्रत्येक सरकारी ऑफिस साठी बँकांमध्ये किंवा कोणतेही लायसन्स काढण्यासाठी जीएसटी काढण्यासाठी किंवा कुठलेही सरकारी कागदपत्रे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आधार कार्डची आवश्यकता लागते हे आपण चांगल्या प्रकारे जाणून आहात तर मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टद्वारे आपण केंद्र सरकार द्वारे व राज्य सरकार द्वारे आधार कार्ड बद्दल एक नवीन अपडेट आली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Adhar Card Updae

Aadhar Card Update 2023

मित्रांनो केंद्र सरकारकडून मोठी अपडेट मिळाली आहे ज्या मार्फत देशातील नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेलच खूप साऱ्या लोकांकडे आधार कार्ड आहेत पण ते दहा वर्ष ते पंधरा वर्षे जुने आधार कार्ड काढलेले आहेत आणि त्यांना अपडेट केले नसेल तर केंद्र सरकारकडून या गोष्टीसाठी (UIDAI) मार्फत निर्देश जारी करण्यात आले आहेत ज्यामध्ये ज्या लोकांचे आधार कार्ड हे दहा वर्ष पूर्वीचे आहेत अशा लोकांनी आपले Aadhar Card Updae करून घ्यावेत अन्यथा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

जर तुमचे आधार कार्ड काढून दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य केले आहे कारण आपल्या सर्वांना माहित आहे जे आपले जुने आधार कार्ड आहेत त्यावरील जन्मतारीख असो किंवा तुमचा पत्ता असो अथवा मोबाईल नंबर असो किंवा आधार कार्ड वरील फोटो असो यामध्ये कालांतराने बदल होत असतात त्यामुळे आपल्याला आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असते आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करू शकता यासाठी माय आधार पोर्टल पोर्टल वरती जाऊन तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता

ज्या व्यक्तींना ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करता येत नसेल त्यांनी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे त्यासाठी आधार केंद्रावर ती आपल्याकडून पन्नास रुपये फी घेतली जाते केंद्र सरकारकडून मिळालेल्या नुकत्याच माहितीनुसार आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शेवटची तारीख म्हणजेच मुदत 15 मार्च 2023 पासून ते 14 जून पर्यंत आपले आधार कार्ड अपडेट करता येईल

ऑनलाइन आधार कार्ड अपडेट कसे करावे

  • सर्वप्रथम आपल्याला UIDI च्या Myadhar पोर्टल myaadhar.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल
  • ही वेबसाईट उघडल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन करण्याचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा
  • व तिथे आपला आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाईप करून घ्यावा व त्याखालील कॅपच्या कोड व्यवस्थित रित्या भरून घ्यावा व सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर आपल्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आपल्याला एक ओटीपी येईल तो ओटीपी व्यवस्थित रित्या भरून घ्यावा आणि लॉगिन या पर्यायावर क्लिक करा
  • लॉगिन झाल्यानंतर आपल्यासमोर आधार कार्ड संबंधित सर्व पर्याय आपल्यासमोर दिसतील
  • आपल्याला डॉक्युमेंट अपडेट हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करावे
  • त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट या पर्यावरण क्लिक करा
  • त्यानंतर तुमच्यासमोर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पर्याय दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आयडी प्रूफ अपलोड करावा लागेल ज्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करू शकता
  • त्यानंतर तुम्हाला पत्ता पुरावा म्हणजेच ऍड्रेस डॉक्युमेंट अपलोड करावा लागेल ऍड्रेस पुरावा मध्ये लाईट बिल मतदान ओळखपत्र तुम्ही पत्ता पुरावा म्हणून देऊ शकता
  • व त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा व कन्फर्म करण्यासाठी ओके या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज समोरील ज्यामध्ये लिहिले असेल की तुम्हाला कुठलीही फीस आकारली जाणार नाही हे सर्व काही फ्री मध्ये अपडेट करता येईल त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा
  • अशा पद्धतीने आपण डॉक्युमेंट अपडेट करू शकता व त्यानंतर आपले आधार कार्ड अपडेट केले जाईल

आधार कार्ड अपडेट करण्याची आवश्यकता कोणाला आहे

मित्रांनो ज्या नागरिकांचे आधार कार्ड दहा वर्षांपूर्वीचे आहेत आणि त्यांनी दहा वर्षांमध्ये आधार कार्ड अपडेट केले नसेल अशा लोकांनाच आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे हे केंद्र सरकारकडून अनिवार्य करण्यात आले आहे आणि हे आधार कार्ड तुम्ही 15 मार्च ते 14 जून पर्यंत निशुल्क अपडेट करू शकाल ऑनलाईन पद्धतीने.

FAQ.

Q1. हे आधार अपडेट कोणासाठी अनिवार्य आहे?

ज्या नागरिकांचे आधार कार्ड दहा वर्ष जुनी आहे आणि त्यांनी दहा वर्षात एकदाही अपडेट केली नाही

Q2. ऑनलाइन आधार कार्ड अपडेट कसे करावे?

myaadhar.uidai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करू शकाल

Q3. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे किती लागतील?

ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पंधरा मार्च ते 14 जून आपण निशुल्क आधार कार्ड अपडेट करू शकाल

Q4. आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किती पैसे लागतील?

जर आपण आधार केंद्रावर ती जाऊन आधार कार्ड अपडेट करत असाल तर आपल्याला पन्नास रुपये फीस भरावी लागेल

Leave a Comment